घरनवी मुंबईउद्या मलाही ईडीची नोटीस येईल; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

उद्या मलाही ईडीची नोटीस येईल; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

Subscribe

रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर भाष्य करताना केंद्राने राज्यावर कृषी कायदा लादला असून सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अशी ग्वाही दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे ४ वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमागे सुरु असलेल्या ईडीच्या चौकश्यांवर बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधत उद्या मलाही ईडीची नोटीस येईल, असा टोला लगावला. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. ईडीच्या नोटीसा भाजपच्या लोकांना न येता केवळ त्यांच्या विरोधकांना येत आहेत. ईडीसारखी संस्था गेली पाच वर्षे राजकीय हेतूने वापरण्यात येत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर निशआणा साधाला.

रोहित पवार यांनी शिवसेनेचे वर्षा राऊत यांनी ईडीकडून सुरू असणाऱ्या चौकशीवर भाष्य करताना ईडीच्या नोटीसा भाजपच्या लोकांना न येता केवळ त्यांच्या विरोधकांना येत आहेत. त्यामुळे कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला ईडीच्या नोटीसा केवळ भाजप विरोधकांना येत आहेत. त्यावरुन समजून जा ईडीचा कसा वापर होत आहे. उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. कदचित उद्या शेतकरी संघटनेच्या लोकांना पण येईल. काय माहिती कोणावर काय येईल. पण सर्वसामान्य लोकांना देखील कळालं आहे, ईडीसारखी संस्था गेली पाच वर्षे राजकीय हेतूने वापरण्यात येत आहे. लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन केली संस्था आता केवळ राजकीय हेतुसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळए राजकीय हेतुने संस्था काम करते तेव्हा काही निष्पन्न होत नाही.

- Advertisement -

केंद्राने राज्यावर कृषी कायदा लादलाय, पण सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल

माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका ही हुकूमशाहीची असल्याचं रोहित पवार म्हणाले. तर केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला असून राज्य सरकार शेतकरी हिताचा योग्य निर्णय घेईल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली आहे. यावेळी आमदार देवेंद्र भोईर, एपीएमसीचे सभापती अशोक डक, एपीएमसचे संचालक संजय पानसरे, शंकर पिंगळे, राष्ट्रवादीचे काँग्रसेचे नवी मुंबई युवक प्रभारी तेजस शिंदे आदि उपस्थित होते.

- Advertisement -

आमदार रोहित पवार यांनी एपीएमसीमधील व्यापारी तसंच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसी मधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचं सांगितलं. शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. एपीएमसी मार्केट मधील शेतकरी हा व्यापाऱ्यांकडून माल घेतो. व्यापारी शेतकऱ्याला वेळेत पैसे किंवा हमी भाव देत नसल्यावर शेतकरी आमच्याकडे तक्रार करतात. त्यावेळी एपीएमसीच्या संचालक, सचिव यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्याचे पैसे द्यायला सांगितल्यांनतर शेतकऱ्यांना त्यांची असणारी रक्कम मिळते. पंरतु खुल्या मार्केट मध्ये शेतकऱ्यांना त्यांचा असणारा हमीभाव तसंच पैसे मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे एपीएमसी मार्केटची आवश्यकता आहे, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -