घरताज्या घडामोडीनाराज नहीं, हैरान हूं मैं! सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

नाराज नहीं, हैरान हूं मैं! सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

Subscribe

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली. तसेच, मी मोदींवर नाराज नाही तर हैरान आहे, असंही त्या म्हणाल्या.

आमच्या दोन्ही नेत्यांनी काहीच केलं नाही. ते फसवले गेले आहेत. ज्याने आरोप मान्य केले त्याला माफीचा साक्षीदार बनवलं गेलं. हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली. तसेच, मी मोदींवर नाराज नाही तर हैरान आहे, असंही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे दोन्ही नेते म्हणजेच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काहीही गुन्हा केला नाही. मात्र, तरीही त्यांच्यावर कारवाई झाली. पण मला विश्वास आहे की त्यांना नक्की न्याय मिळेल. त्यांना कोर्टाकडून क्लिन चिट (Clean Cheat) मिळेल याची मला खात्री आहे.

- Advertisement -

असं सांगतानाच त्यांनी केंद्रावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, जे लोक केंद्राविरोधात बोलले आहेत त्यांच्यावर नेहमीच छापे (Raid)टाकण्यात आले. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरात तर १०९ वेळा छापे टाकण्यात आले. हा तर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड (Limca Book Of Record) झाला. १०८ वेळा टाकलेल्या छाप्यात त्यांना काहीच आढळलं नाही म्हणून १०९ वा छापा टाकावा लागला. पण तरीही त्यांच्या हाती काहीच सापडलं नाही.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी सचिन वाझेप्रकरणीही (Sachin Vaze) आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या की, ज्या माणसावर प्रचंड आरोप आहेत त्याच माणसाला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे. सचिन वाझेने गुन्हे स्वतःहून मान्य केले आहेत. तरी त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं. हा कोणता न्याय आहे? संसदेत मी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्याशी बोलणार आहे. सध्या मी नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही तर हैरान आहे, असंही त्या म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -