घरमहाराष्ट्रराहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला राष्ट्रवादीचा पाठिंबा; अनेक नेते होणार सहभागी

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राष्ट्रवादीचा पाठिंबा; अनेक नेते होणार सहभागी

Subscribe

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होईल, ही यात्रा महाराष्ट्रात 14 दिवस चालणार असून 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून ती जाणार आहे. त्याचवेळी राहुल गांधी 10 आणि 18 नोव्हेंबर रोजी राज्यात दोन सभांना संबोधित करणार आहेत. दरम्यान राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे बडे नेतेही या यात्रेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (NCP support for Rahul Gandhi s congress Bharat Jodo Yatra)

महेश तपासे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे 55 दिवस ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे. भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत 10 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही उपस्थित राहणार असल्याचे महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होईल, यावेळी राहुळ गांधी राज्यात दोन सभांना संबोधित करणार आहेत. पहिला मेळावा 10 नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात तर दुसरा मेळावा 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 382 किलोमीटरचे अंतर कापून ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यात पाच दिवस राहणार असून तेथून 11  नोव्हेंबरला हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करून 15 नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यात पोहोचेल.


सत्तारांवर पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी; महिला आयोगाचे आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -