घरठाणेसुळेंबाबतच्या 'त्या' विधानाचं प्रकरण चिघळलं, बदलापुरात सत्तारांच्या फोटोला जोडे मारून निषेध

सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानाचं प्रकरण चिघळलं, बदलापुरात सत्तारांच्या फोटोला जोडे मारून निषेध

Subscribe

बदलापूर – शिंदे फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अर्वाच्य भाषेत वक्तव्य केल्यामुळे बदलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने शहर कार्यालयासमोर फोटोला जोडे मारत आणि अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याची चिरफाड करून आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, माफीसाठी राष्ट्रवादीने दिले 24 तास

- Advertisement -

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्तार यांचा विविध प्रकारच्या आंदोलनातून निषेध करण्यात येत आहे. बदलापूर शहरात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने बेलवली परिसरात कल्याण बदलापूर मुख्य रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळा बनवत आला होता या पुतळ्याची चिरफाड करून सत्तार यांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल जर राज्याचे कृषिमंत्री असे वक्तव्य करतात तर ते इतर महिलांचा कसा आदर राहत असतील असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असते ते सांगत सत्तेत आले मात्र त्यांची खरी अवकात काय आहे ती आज संपूर्ण महाराष्ट्राला दिसली अशी संतप्त भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रियंका दामले यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मी सॉरी बोलतो; सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर अब्दुल सत्तारांचा माफीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, भूषण कराळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विनय सरदार यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -