घरमहाराष्ट्रसत्तारांवर पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी; महिला आयोगाचे आदेश

सत्तारांवर पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी; महिला आयोगाचे आदेश

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली. या टीकेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. सत्तारांच्या आक्षेपार्ह टीकेमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी देखील अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याप्रकरणी तीव्र आंदोलन केले. सत्तारांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. दरम्यान सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सत्तारांवर पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करत त्याबाबत अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिला आहे. तसेच सत्तारांवर पोलिस महासंचालकांना कायदेशीर कारवाईबाबतचे दिलेले पत्रही त्यांनी शेअर केले आहे.

- Advertisement -

रुपाली चाकणकर ट्विट करत म्हणाल्या की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सत्तारांना आपल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडून सत्तारांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


एकनाथ शिंदेंनी केला सत्तारांना फोन? सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -