घरमहाराष्ट्रनिवडणूक आयोग आता पिंजऱ्यातला पोपट झाला; ठाकरे गटाकडून हल्लाबोल

निवडणूक आयोग आता पिंजऱ्यातला पोपट झाला; ठाकरे गटाकडून हल्लाबोल

Subscribe

राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. या पाच राज्यात भाजप सत्ता मिळविण्यासाठी ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपकडून करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान मत मिळविण्यासाठी विविध प्रलोभणे दाखविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर यावर निवडणूक आयोग काहीच कसे बोलत नाही म्हणत निवडणूक आयोग आता पिंजऱ्यातला पोपट झाला आहे असा थेट हल्ला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरातून केला आहे. (The Election Commission is now a caged parrot Attacked by the Thackeray group)

राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. या पाच राज्यात भाजप सत्ता मिळविण्यासाठी ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाच याच निवडणुकींच्या प्रचारादरम्यान भाजपकडून करण्यात आलेल्या विविध घोषणांचा ठाकरे गटाकडून समाचार घेण्यात आला आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) रोजी ‘सामना’ तील रोखठोक सदरातून खासदार संजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

- Advertisement -

भारताचा सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे एक भंपकपणाचे प्रतीक बनला आहे. या देशाला एक निवडणूक आयोग आहे व मनात आणले तर तो स्वतंत्रपणे कर्तव्य बजावू शकतो, हे टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात दिसून आले. निवडणूक आयोगाच्या डरकाळीची तेव्हा गरज नव्हती, तर वाघाने शेपटी हलवली तरी सर्वच राजकीय पक्षांचा थरकाप होत असे. त्याच निवडणूक आयोगाचा आता पिंजऱ्यातला पोपट झाला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ते सिद्ध झाले आहे असा थेट हल्ला रोखठोक सदरातून खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर भाजपच्या पायाखालची वाळू या निवडणुकीत सरकली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहांपासून सर्वच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. त्यामुळे ‘धार्मिक’ प्रचार करून बुडती नौका वाचवणे हेच त्यांचे धोरण बनले आहे. मध्य प्रदेशातील ‘गुणा’ येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा प्रचारास गेले व त्यांनी जाहीर केले की, “मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामलल्लांचे मोफत दर्शन घ्या. जनतेला रामाचे मोफत दर्शन घडवू. त्याचा खर्च भाजप करील.” अमित शहा यांचे हे विधान सरळ सरळ धार्मिक प्रचारात मोडते. मतदारांना ‘लाच’ देऊन मते मागण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे व यावर देशाचा निवडणूक आयोग मूग गिळून व डोळे बंद करून बसला, हे लोकशाहीस मारक आहे. असे म्हणत भाजप नेत्यांसह निवडणूक आयोगाचेही खासदार संजय राऊत यांनी कान टोचले आहेत.

हेही वाचा : “मोदी होते म्हणून…”, अहमदाबादमध्ये मॅच आयोजित केल्याने संजय राऊतांचा मिश्किल टोला

- Advertisement -

बाळासाहेबांचा मतदानाचा हक्का हिरावून घेतला होता

आजच्या रोखठोक सदरातून खासदार संजय राऊत यांनी हिंदूत्वाचा प्रचार केल्याप्रकरणी बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क सहा वर्षांसाठी काढून घेतला होता ही आठवणसुद्धा सांगितली. त्यांनी लिहले की, हिंदुत्वाचा पुरस्कार करणे वेगळे व निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार करून मते मागणे वेगळे. जुलै 1999 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. केवळ मतदानच नव्हे, तर निवडणुकीलाही उभे राहण्यास मनाई केली होती. हिंदुत्वाच्या म्हणजेच धर्माच्या नावावर मते मागितल्याचा त्यांच्यावर ठपका होता. 1987 सालची विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे विरुद्ध शिवसेनेचे रमेश प्रभू असा तो सामना झाला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर लढवलेली ती पहिली निवडणूक होती. ‘गर्व से कहो हम हिंदू है!’ असा जोरदार नारा तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता. पराभूत प्रभाकर कुंटे यांनी नंतर मुंबई हायकोर्टात याचिका केली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याचे कोर्टाने मान्य केले व त्यांना सहा वर्षांसाठी मतदानासाठी वंचित केले. हिंदुत्वासाठी एखाद्या नेत्याने केलेला हा सर्वोच्च त्याग होता. रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मयेकर या शिवसेना आमदारांना हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आमदारक्या गमवाव्या लागल्या.

हेही वाचा : जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला तोडू नका, संजय राऊतांचे आवाहन

आज हिंदुत्वाची ठेकेदारी चालवणाऱ्या भाजपला हिंदुत्वासाठी असा त्याग व संघर्ष कधीच करावा लागला नाही. निवडणूक आयोग व इतर घटनात्मक संस्थांना ‘मानेज’ करून ते हिंदुत्वाच्या लढाया लढले. त्या लढाया लुटूपुटूच्या होत्या. पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला व त्यावर भारत-पाकिस्तान, हिंदुत्व हे मुद्दे आणून 2019 च्या निवडणुकीत ते उतरले. ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपट व पंडितांचे ‘टार्गेट किलिंग’ या मुद्दय़ांवर त्यांनी भावना भडकवून हिंदू मते मागितली, पण पंडितांचे भले झाले नाही. कधी हिजाब तर कधी बजरंग बलीस प्रचारात उतरवून पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांनी निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग केला तरीही निवडणूक आयोग नामक पोपटाने साधी फडफड केली नाही. आता तर श्री. अमित शहांनी मध्य प्रदेशच्या मतदारांना ‘राम लल्ला’च्या नावाने साकडे घातले. हे एखाद्या काँग्रेसच्या पुढाऱ्याने केले असते तर एव्हाना ‘ईडी’प्रमाणे निवडणूक आयोगाचे वारंट त्याच्या घरी पोहोचले असते असेसुद्धा आजच्या रोखठोकमध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -