घरमहाराष्ट्रस्व. बाळासाहेब ठाकरे महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत म्हणाले होते..

स्व. बाळासाहेब ठाकरे महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत म्हणाले होते..

Subscribe

सध्या शबरीमाला आणि तुळजापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यावर आज शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ज्या ठिकाणी पुरुषवर्ग भाविक जाऊ शकतो, त्या प्रत्येक ठिकाणी स्त्रिया जाऊ शकतात. शिवसेनेची भूमिका ही प्रबोधनकारी हिंदुत्वाची आहे. दुर्दैवाने त्याठिकाणी सरकारने निर्णयाची अंमलबजावणी केल्यावर काही गैरसमजातून शबरीमाला मंदीर अपवित्र झाले, हे प्रकार होणे चुकीचे आहे. देव हा पवित्र असतो आणि स्त्रीयांनी मंदिरात गेल्यावर देव अपवित्र होतो ही भूमिकाच चुकीची असल्याचे, मत आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. स्व. मिनाताई ठाकरेंचा आज जन्मदिवस म्हणून साजरा करत असताना राजगुरुनगर येथे शिवसेना शाखेमध्ये विधानपरिषद आमदार निलम गोऱ्हे यांच्या हस्ते मिनाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ममता दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

“स्त्री आणि पुरषांमध्ये होणारे भेदभाव करणे कितपत योग्य याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. शेवटी मानवी देहधर्म महिला आणि पुरुष दोघांनाही आहेत. त्यामुळे ही भूमिका आणि कुठेतरी अवैज्ञानिक दिशाभूल करणारी आहे, हिच चिंतेची बाब आहे. त्यामुळे भेदभाव वाढवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करु नये”, असा सल्लाही आमदार गोऱ्हे यांनी दिला.

- Advertisement -

युतीचा संसार आतापर्यंत कसाबसा टिकला

“भाजपबरोबर सत्तेत असतानाही शिवसेनेने कायम विरोधाची भूमिका घेतली. काही वेळेला शिवसेनेने बंड करत सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. तरीही कसाबसा शिवसेनेचा भाजप युतीसोबतचा संसार आजपर्यत टिकला”, असा गौप्यस्फोट आमदार निलम गोऱ्हे यांनी केला.

सध्या निवडणुकीच्या चर्चेने जोर धरला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना युती होणार की नाही? यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. असे असताना युतीच्या वळणावर अनेक जण स्वतःचे ‘गियर’ बदलण्याच्या तयारीत आहे. त्या आज राजगुरुनगर येथे दिवंगत मिनाताई ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होत्या.

- Advertisement -

आता हा युतीचा संसार पुढे निरंतर टिकणार कि नाही? यावर शिवसेनेतच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नेत्यांना आपले स्थान प्रबळ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच युतीच्या वळणावर अनेक जण स्वतःचे गियर बदलण्याच्या तयारीत असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -