…ही कुठली पद्धत; चौकात आहात का तुम्ही?, नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले

gulabrav patil

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत वादावादी पाहायला मिळाली. यावेळी संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे या गुलाबराव पाटील यांच्यावर संतापल्या. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना झापले. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापले. छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी झालेल्या गदारोळात विरोधही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. जोरदार गदारोळ यावेळी झाला.

सभागृहात नेमके काय घडले? –

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरु हाता. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?, अशी ताकीद दिली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे! यावर डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? हे  अहो शांत राहा, असे म्हणाल्या

नेमका वाद का ? –

शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधकांच्यात गोंधळ झाला.  त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केले, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. गुलाबराव पाटलांना निलम गोऱ्हेयांनी झापले.