Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही'; छगन भुजबळांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

‘नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही’; छगन भुजबळांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु आहे. दुसऱ्या दिवशी विधानसभेत जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. याच जीएसटी सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु आहे. दुसऱ्या दिवशी विधानसभेत जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. याच जीएसटी सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जीएसटीचे विधेयक मांडले. त्यावेळी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. नाहीतर एक मिनिट बोलले तर जीएसटी लावतील”, असे भुजबळ यांनी म्हटले. (Chhagan Bhujbal slams dcm devendra Fadnavis on gst speech)

“नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. नाहीतर एक मिनिट बोलले तर जीएसटी लावतील, आम्ही पेपरात वाचलं की फडणवीस यांची ताकद वाढली आहे. केंद्राच्या कुठल्या तरी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. जरा तिथे जाऊन सांगा अन्नधान्यावर जीएसटी लावू नका”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “राजाच्या तिजोरीच्या चाव्या या पहिल्या इकडे होत्या. त्या आता समोर गेल्या आहेत. अजित दादा आता डोळे मारत आहेत. शाळेतील पुस्तकांवर ही जीएसटी लावण्यात आला आहे. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जीएसटीमधील पळवाट बंद केली आहे. दूध आणि दही कोणाला विकायाचे असेल त्यावर जीएसटी नाही. नानाभाऊ तुमचे सरकार असताना आम्ही म्हणायचो की पेट्रोल डिझेलचे दर कमी करा मात्र ते तुम्ही केले नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. कालच सीएनजी वरील कर केंद्राने कमी केला आहे.”

सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थानावर

- Advertisement -

“तुम्ही मुख्यमंत्री झालात ते मला चांगले वाटले. वेगळ्या पद्धतीने मला चांगली गोष्ट वाटते कारण की हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहेत. पण यांची काळी दाढी आहे. त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. सफेद दाढीचा प्रभाव हा हिंदुस्थानावर आहे”, असे भुजबळ म्हणाले. यावर प्रत्यत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी “जीएसटी संदर्भात जे काही बदल झाले आहे त्यानुसार आपण हे बिल आणले आहे. भुजबळसाहेब हे लोकसभेतले भाषण होते पण ते आपण विधानसभेत केले. आमच्याकडे सफेद दाढीचा फार सन्मान केला जातो, असे म्हटले.


हेही वाचा – पालघरमध्ये जुळ्या बालकांच्या मृत्यूप्रकरणी उपाययोजना करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -