घरमहाराष्ट्रसंजय राऊतांविरोधात सोमय्यांची नवी तक्रार, गुन्हा न नोंदवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

संजय राऊतांविरोधात सोमय्यांची नवी तक्रार, गुन्हा न नोंदवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरूच असून सोमवारी सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या आणि कुटुंबीय उपस्थित होते. राऊत यांनी आपल्याविरोधात सामना दैनिकाच्या संपादकीयमध्ये अपशब्द वापरल्याचा दावा मेधा सोमय्या यांनी केला. त्यामुळेच त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांवर टॉयलेट घोटाळ्यासंदर्भात आरोप केले होते. त्यावर सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रूनुकसानीची तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. आपण पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून एफआयआर दाखल झाला नाही तर शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझ्याविरोधात १२ घोटाळ्यांचे आरोप केले आहेत, मात्र त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत, असेही सोमय्या यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, सोमय्यांनी पोलीस ठाणे गाठण्यापूर्वी संजय राऊतांनी ट्विट करीत सोमय्या कुटुंबाशी संबंधित युवक प्रतिष्ठानवर नवा आरोप केला आहे. ज्या कंपनीवर सोमय्यांनी आरोप केले होते, त्याच कंपनीने युवक प्रतिष्ठानला मोठा निधी दिल्याचा दावा राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी जो निधी जमवला, त्या निधीचा सोमय्यांनी अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

- Advertisement -

ज्यावेळी तुम्ही दुसर्‍यांवर खोटे आरोप करता, त्यावेळी तुमच्यावरचे खरे आरोप तुम्ही स्वीकारले पाहिजेत. नुसते आकांडतांडव करून, भोंगे लावून, बोंबा मारून खोटे आरोप खरे ठरत नाहीत.
-संजय राऊत, खासदार, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -