घरमहाराष्ट्रविजेची तार तुटून पडल्याने ९ गायींचा दुर्दैवी मृत्यू

विजेची तार तुटून पडल्याने ९ गायींचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कनोली येथे विजेची तार तुटन गोठ्यात पडल्याने ९ गायींचा जागीच मृत्यू झाला आहे

अहमदनगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील गोठ्यावर विजेची तार पडल्याने ९ गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या गायी नानासाहेब ठकाजी वर्पे यांच्या होत्या. दरम्यान गायींच्या मृत्यू मुळे ठकाजी वर्पे यांच्यावर  दुखाःचा डोंरग कोसळला आहे. यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. गायींना ३३ कोटी देवांचा दर्जा दिला जात असल्याने ,आणी उत्पन्नाचे साधन असलेल्या गायींच्या मृत्यू मुळे ठकाजी वर्पे यांचे ऐन दुष्काळात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

 

दुष्काळात वर्पे कुटुंबावर संकट

दुष्काळजन्य परिस्थिती असताना अचानक तार कोसळून ऐकाच वेळी नऊ गायींचा मृत्यू झाल्याने नानासाहेब ठकाजी वर्पेंच्य कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहीले आहे. घराशेजीरीच असलेल्या गोठ्याजवळ या नऊ गायी बांधलेल्या होत्या. गोठ्याच्या शेजारीच असलेली विजेची मुख्य वायर आचानक तुटल्याने या गायींचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

नुकसान भरपाईची मागणी

मात्र विजवितरण कंपनीने या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. सदर घटनेत वर्पे कुटूंबाचे झालेले लाखा रूपयांचे नुकसान विजवितरण कंपनीने भरून द्यावे अशी मागणी गावकरी करत आहेत. माहावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -