घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचा हा "नवा" महाराष्ट्र, मंदिर बंदवरुन नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

उद्धव ठाकरेंचा हा “नवा” महाराष्ट्र, मंदिर बंदवरुन नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

Subscribe

हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे - नितेश राणे

महाराष्ट्रात मंदिर बंदच राहाणार कारण हा उद्धव ठाकरेंचा नवा महाराष्ट्र आहे. अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर केली आहे. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये मोठी सूट दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथिल केले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरु करण्यात आले आहेत. मात्र मंदिर बंद ठेवण्यात आले असल्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे.

मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारुच्या दुकानांसमोर होते असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी केलं आहे. तर हिंदू हो तो डर के रहो असा खोचक टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मंदिर बंद सुरु करण्यासाठी भाजपकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. भाजपच्या अध्यत्मक आघाडीकडूनही मंदिर सुरु करण्याची मागणी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण.. हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे.. हिंदू हो.. तो डर के रहो.. ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र !!” अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणेंनी ट्विट करत हिंदुत्वाच्या मुद्द्याची शिवसेनेला आठवण करुन दिली आहे.

- Advertisement -

दारुची दुकाने सुरु मात्र…

राज्यातील दारुची दुकाने सुरु केली मात्र मंदिरे सुरु बंद ठेवली आहेत. जेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आम्हा हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते मंदिरातले पुजारी असे असंख्य लोकं मंदिरावर अवलंबून आहेत. यामुळे त्यांचा विचार करुन मंदिरं लवकर सुरु करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


हेही वाचा : Maharashtra Unlock: एका अटीमुळे मुंबईतील मॉल्स अद्यापही बंदच!


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -