घरताज्या घडामोडीमुंबईकर कौरवांच्या मर्जीचं राज्य अनुभवत आहेत, नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबईकर कौरवांच्या मर्जीचं राज्य अनुभवत आहेत, नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

१७ जन मृत्यूशी झुंज देत आहेत. एका ४० वर्षीय तरुणाचा बळी गेलेला आहे. त्या घटनास्थळी जाऊन आजपर्यंत तुम्ही भेट ही दिली नाही. असे नितेश राणे म्हणाले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर सिंहसनावर धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मर्जीच राज्य येत हेच आता मुंबईकर अनुभवत अशी टीका नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. वाढीव बांधकामावरुन नितेश राणेंनी महाविकास आघाडी आणि मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे. सत्तेची लालसा आणि अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरते आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यामुळे बांधकाम सुरु आहेत.

भाजप नेते नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय सिंहासनावर धृतराष्ट्र बसला असेल. तर कौरवांच्या मर्जीच राज्य येत हेच आज मुंबईकर अनुभवत आहेत. ९ जूनला आपल्या निवासस्तानाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शास्त्रीय नगर मध्ये एक अनधिकृत इमारत ढासळले. १७ जन मृत्यूशी झुंज देत आहेत. एका ४० वर्षीय तरुणाचा बळी गेलेला आहे. त्या घटनास्थळी जाऊन आजपर्यंत तुम्ही भेट ही दिली नाही. असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई मध्ये ४० फुटांवर बांधकाम करायला बंदी आहे. पण मतांच्या राजकारणासाठी मुंबई बाहेरून आलेल्या लोकांसाठी बांधकामाला हे आपलेच नगरसेवक परवानगी देत आहेत. आणि या सगळ्याला आपली मूकसंमती आहे का ? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. एका बाजूला विरोधकांना अनधिकृत बांधकामांचे नोटीस पाठवायच्या आणि दुसऱ्याबाजूला आपलेच नगरसेवक या अनधिकृत बांधकामाला परवानगी देत आहेत. आणि आपण एक चकार शब्द काढत नाही आहात.
आपण जनेतेचे मुख्यमंत्री आहात की विशिष्ट राजकीय पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांचे आहात असा प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये दृढ होत चाललेला आहे

- Advertisement -

हेही वाचा : श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -