घरमहाराष्ट्रनितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी; माझ्या विचारांचा सरपंच द्या, अन्यथा गावचा विकास होऊ...

नितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी; माझ्या विचारांचा सरपंच द्या, अन्यथा गावचा विकास होऊ देणार नाही!

Subscribe

Nitesh Rane | जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे आकेडमोड आहे. आपण लपवाछपवी करत नाही.

सिंधुदुर्ग – आमच्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी मिळू देणार नाही, अशी धमकी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सिंधुदुर्गातील नांदगावात गेले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितेश राणे बोलत होते.

हेही वाचा …तर राज्यात राष्ट्रवादीचा पक्ष पहिल्या क्रमांकावर येईल; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

- Advertisement -

सरपंचपदाला न्याय देईल असा उमेदवार आम्ही दिला आहे. केवळ नामधारी उमेदवार दिला नाही. गावाचा विकास करेल, गरज पडल्यास माझ्याशी बोलेल. राणे साहेबांशी बोलेल, अशी व्यक्ती आम्ही उमेदवार म्हणून दिली आहे. नांदगाव हे महामार्गालगत गाव आहे. त्यामुळे साईड रोड बनेल तेव्हा दोन्ही बाजूंना विकास होईल. तेव्हा येथे आपल्या विचारांचा सरपंच असणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून मी स्पष्टपणे सांगत आहे.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धमकीच दिली. गावचा सरपंच आपलाच पाहिजे, नाहीतरी विकासनिधी दिला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे आकेडमोड आहे. आपण लपवाछपवी करत नाही.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, आम्ही नारायण राणेंच्या तालमीत तयार आजेलेल विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाही. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही, याची मी निश्चीतपणे काळजी घेईन. आता याला तुम्ही धमकी सजमा किंवा काहीही समजा. कारण आता सगळा निधी माझ्या हातात आहे.

जिल्हा नियोजन, ग्रामविकास, २५:१५ निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. मी सत्ते असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असोत किवां मुख्यमंत्री असोत मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. त्यामुळे नितेश राणेंच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे समजून घ्या, असं नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा – बिनविरोध सरपंच निवडून आणा, नितेश राणेंकडून 50 लाखांची ऑफर; व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीही नितेश राणे यांनी सरपंचपदासाठी ऑफर दिली होती. आमचा सरपंच निवडून आणल्यास गावाला ५० लाखांचा निधी देऊ असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -