घरमहाराष्ट्रफडणवीसजी 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघायचं सोडून द्या - नितीन राऊत

फडणवीसजी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघायचं सोडून द्या – नितीन राऊत

Subscribe

राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून आता र्जामंत्री नितीन राऊत यांनी यामध्ये उडी घेतली असून फडणवीसांनी 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघायचं सोडून द्या असा खरमरीत टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ पाहणं बंद करावं असा खरमरीत टोला काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे. या संकटाशी एकत्रितपणे लढण्या ऐवजी भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटी घेत आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पाडून सत्ता स्थापन करण्याची स्वप्नं भाजप पाहत आहे. मात्र त्यांचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राबद्दल मुंगेरीलाल के हसीन सपने बघायचं सोडून द्या असा टोला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे. कोरोना युद्धात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मात्र यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही अशा शब्दात टीकेची तोफ डागली. याबाबतचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोरोना विरुद्धचं हे युद्ध नक्की जिंकेल, असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देत आहे, असंही नितीन राऊत म्हणाले. सध्याची वेळ कोणतंही राजकारण करण्याची नाही. मात्र भाजपाला राजकारण करायचं असून त्यांना राज्यातलं सरकार पाडायचं आहे. मात्र त्यांना त्यांच्या मनसुब्यांमध्ये कधीही यश येणार नाही असं उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.


हेही वाचा – वृक्षांची तहान भागवणारे अवलीये

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -