घरCORONA UPDATEआयुक्त तुकाराम मुंढे PPE किट घालून कोरोना वॉर्डात दाखल

आयुक्त तुकाराम मुंढे PPE किट घालून कोरोना वॉर्डात दाखल

Subscribe

आपल्या बेधडक भूमिका आणि निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या नागपूरच्या महानगरपालिका आयुक्तपदी कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेकदा कठोर निर्णय घेतले आहे. मात्र त्यांचा एक वेगळाच अंदाज आज नागपूरकरांना पहायला मिळाला. कोरोना लॉकडाउन काळात बाजारपेठेत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर मुंढे यांनी रस्त्यावर उतरून कारवाई करणाऱ्या आयुक्तांनी आज पीपीई किट करून कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्णांची भेट घेतली.

कशासाठी….?नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यू पावणाऱ्यांचा आकडाही…

Posted by Tukaram Mundhe on Monday, July 20, 2020

- Advertisement -

शहरातील एकाही व्यक्तीचा जीव कोरोनामुळे जाऊ नये हा माझा प्रयत्न आहे. याचसोबत मिशन बिगीन अगेन अंतर्गत मिळालेल्या सवलतींकडे संधी म्हणून पाहणो गरजेचो आहे. कोणतेही नियम मोडले जाणार नाही याची काळजी घेणो हे प्रत्येक नागरिकाचो कर्तव्य असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले. नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन बनवला होता. नागपूरमधील सतरंजीपुरा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी सतरंजीपुरामधील जवळपास १७०० लोकांना क्वारंटाईन केले. तसेच या परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे २०० जवान तैनात केले. तसेच गरोदर मातांची तपासणी, टीबी पेशंट शोधून त्यांची वेगळी तपासणी असे अनेक उपक्रम मुंढे यांनी राबवले.

हेही वाचा –

मोठी बातमी! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील Vaccine सुरक्षित आणि रोगप्रतिकारक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -