आरे कारशेडसाठी नव्याने वृक्ष कत्तलींची गरज नाही, फडणवीसांचा दावा

कारशेड पूर्ण करण्याकरता आता अजून झाडे कापण्याची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Devendra Fadnavis criticizes NCP

शिंदे गट आणि भाजपचं सरकार येताच आरेतील मेट्रोच्या कारशेडला (Metro arey carshed) ग्रीन सिग्नल देण्यात आला. सत्तेच्या पहिल्याच दिवशी मेट्रो कारशेडविषयी मोठा निर्णय घेण्यात आल्याने पर्यावरणवादी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मेट्रोला विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखं आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Cm Uddhav Thackeray) म्हणाले. तसंच, मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे कारशेड पूर्ण करण्याकरता आता अजून झाडे कापण्याची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. (No need of extra tree cutting in arey carshed, says Devendra Fadnavis)

हेही वाचा – कायद्यातील निष्णात असलेले अध्यक्ष कायदेमंडळाला मिळाले – देवेंद्र फडणवीस

आरेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आरेसंदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आहे तर, काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच तो प्रकल्प सुरू झाला. मेट्रो कारशेडसाठी झाडे कापलेली आहेत. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही. पुढच्या वर्षभरात काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हेही वाचा – तुम्हीच जावयाची काळजी घ्या, निवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, सर्व झाडे मिळून त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जितकं कार्बन शोषून घेतील तेवढं कार्बन मेट्रो ८० दिवसांच्या फेऱ्यात शोषून घेईल. म्हणूनच, सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेडसाठी परवानगी दिली. कापलेली झाडे आता पुन्हा लावता येणार नाहीत, हे माहित असूनही पर्यावरणवादी आंदोलन करत आहेत. काही पर्यावणवाद्यांना अपूर्ण माहिती असेल. काहींचं आंदोलन छद्म पर्यावरणवादी बनून स्पॉन्सर्ड असण्याची शक्यता आहे. तथापि, सर्व पर्यावरणवाद्यांचा आदर राखून त्यांच्याशी चर्चा करू, असंही फडणवीस म्हणाले.

मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्याने मुंबईत प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे हे पाप आम्ही होऊ देणार नाही. मेट्रोला विरोध म्हणजे पर्यावरणाला विरोध. कांजूरला मेट्रोचं कारशेड नेलं तर चार वर्षे बांधकामाला लागतील. १० ते १५ हजार कोटींचा खर्च होईल. नाकापेक्षा मोती जड होईल. त्यामुळे मुंबईकरांना लवकरात लवकर ही मेट्रो मिळण्याकरता पर्यावरणपूरक निर्णय आम्ही घेणार आहोत. पर्यावरणवादी पर्यावरणाचा मुद्दा घेऊन उच्च न्यायालयात गेल. तिथे हरले. सर्वोच्च न्यायालयात हरले.

हेही वाचा – नार्वेकर विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर किती दिवस बसणार? सुनील प्रभूंचा सवाल

नव्याने काही ठिकाणी वन जमिनी केली आहेत. त्याबाहेरच्या जागेवर आम्ही डिझायन करणार आहोत. पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो, आरेचे जे आंदोलन आहे ते ज्यांना अर्धवट आहे तेच आंदोलन करत आहेत. पर्यावरणाचा मुद्दे घेऊन न्यायालयात हरले, सर्वोच्च न्यायालयातही हरले. सर्वोच्च न्यायालयानेच तिथे कारशेड तयार करायला परवानगी दिली. तसेच, मुंबईकर जी दररोज अशुद्ध हवा ग्रहण करत आहेत, ती वाचवण्यासाठीच आम्ही मेट्रो आणत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

निर्णय सरसकट रद्द करणार नाही

अवघ्या आठ दिवसांत महाविकास आघाडीच्या सरकारने तब्बल ३०० हून अधिक जीआर बनवले. हे सर्व निर्णय सरसकट रद्द करणार नसल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, मागच्या सरकारचे निर्णय सरसकट रद्द करणार नाहीत, जे चुकीचे निर्णय आहेत ते अभ्यासपूर्ण विचार करूनच रद्द करण्यात येतील.

उद्या विश्वासमताचा प्रस्ताव

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात विश्वासमताचा प्रस्ताव बहुमताने पारित होईल, असा विश्वास आहे. अॅड. राहुल नार्वेकर यांच्या रुपाने कायदेतज्ज्ञ, विधितज्ज्ञ अतिशय युवा तरुण अध्यक्षरुपाने महाराष्ट्राला प्राप्त झाले. त्यांचेही मनापासून अभिनंदन.