घरताज्या घडामोडीतुम्हीच जावयाची काळजी घ्या, निवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

तुम्हीच जावयाची काळजी घ्या, निवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

Subscribe

अनेकांच्या बोलण्यातून त्यांच्या जावईपणाचा उल्लेख झाला. आता तुम्हीच जावयाची काळजी घ्या. तुम्हीच मला सांभाळून घ्या, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी सर्वांना पलटवार केला आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचे जावई राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर जावयाने सासऱ्यांकडील मंडळीकडे लक्ष ठेवावं अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. तर, अनेकांच्या बोलण्यातून त्यांच्या जावईपणाचा उल्लेख झाला. आता तुम्हीच जावयाची काळजी घ्या. तुम्हीच मला सांभाळून घ्या, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी सर्वांना पलटवार केला आहे. (Assembly Speaker Rahul Narvekar thanks about his selection)

हेही वाचा – …आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या

- Advertisement -

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. तर राजन साळवी यांच्यासाठी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत 164 मतांनी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. तर, राजन साळवी यांना आघाडीची 107 मते मिळाली.

हेही वाचा राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

- Advertisement -

दरम्यान, भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी माझी निवड केली त्यानिमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो, असं राहुल नार्वेकर म्हणाले. गेल्या काही दिवसात अनेक धक्के, भूकंप आले. त्यातील एक धक्का मलाही मिळाला. माझी निवड झाली असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले.

हेही वाचा राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

दरम्यान, मी जावई असल्याचं सांगत अजित पवार, जयंत पाटील यांनी काळजी घेण्यास सांगितलं. पण त्यांनीही जावयाची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य सहकार्य मिळेल यात शंका नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -