बृजभूषण सिंहांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, मुंबईतील उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना पाठिंबा

ज्या दिवशी बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा त्यांना चपलांचा हार घालू असा इशारा गोविंद पांडे यांनी दिलाय. आम्हालासुद्धा १४९ ची नोटीस देण्यात आली होती असे त्यांनी सांगितले आहे.

North Indians in Mumbai support Raj Thackeray and alleged Sharad Pawar help Brijbhushan Singh
बृजभूषण सिंहांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, मुंबईतील उत्तरभारतीयांचा राज ठाकरेंना पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत पाऊल ठेवून देऊ असे बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होते. परंतु बृजभूषण यांच्याविरोधात आता उत्तर भारतीय एकवटले आहेत. राज ठकारेंना पाठिंबा दिला आहे. बृजभूषण मुंबईत आले तर त्यांना चप्पलांचे हार घालू असे उत्तर भारतीय संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत उत्तर भारतीय संघटनेने बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करुन घोषणाबाजी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका घ्यायला गेल्या १४ वर्षांपासून बृजभूषण सिंह झोपले होते का? असा सवाल जीवनधारा फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पांडे यांनी केला आहे. तसेच मुंबईत उत्तर भारतीय संघटनेने बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केल आहे. सिंह यांनी राज ठाकरेंना महाराष्ट्रात येऊन विरोध करायला पाहिजे होता. आपल्या घरी बसून कोणीही धमक्या देऊ शकते. २००८ पासून तुम्ही कुठे होता? बृजभूषण यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे. बृजभूषण आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. शरद पवार यांनीच राज ठाकरेंना अयोध्येत जाण्यापासून अडवण्यासाठी ट्रॅप आखला होता.

भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मध्यस्थी करायला पाहिजे होती. बृजभूषण सिंह अयोध्येत जे काही करत आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रात पडले तर ते महाराष्ट्रात येणार आहेत का? परंतु राज ठाकरे अयोध्येत जातील तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही जाऊ तसेच त्यांचे अयोध्येमध्ये स्वागत देखील करु. तसेच ज्या दिवशी बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा त्यांना चपलांचा हार घालू असा इशारा गोविंद पांडे यांनी दिलाय. आम्हालासुद्धा १४९ ची नोटीस देण्यात आली होती असे त्यांनी सांगितले आहे.

बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंना विरोध

उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती. राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये बृजभूषण यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होते. राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.


हेही वाचा : काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून महाराजांना चुकीची माहिती दिली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल