काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून महाराजांना चुकीची माहिती दिली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

bjp Devendra Fadnavis slams mahavikas aghadi govt on Rajya Sabha election 2022

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता. मात्र छत्रपती संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराजांची स्वतःच हा आरोप खोडून काढला. त्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

मी जे काही बोललो ते सत्य बोललो

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं असलं तरीही त्यासंदर्भात मी बोलणार नाही. मला वाटतं त्यासंदर्भात स्वत: संभाजीराजेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे, ती पूर्ती बोलकी आहे. संभाजीराजेंनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितलं आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण सांगतो की, मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्यामुळे मला असं वाटतं की, ही बोलकी प्रतिक्रिया आहे.

काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट…

मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली. हे लोक एकीककडे महाराजांना अशी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराजांमध्ये काही तरी अंतर आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम जे करत आहेत. त्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दु:ख आहे, असं फडणवीस म्हणाले.

मला एक गोष्ट यामध्ये निश्चितपणाने वाटते की, छत्रपती संभाजी राजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होतं आणि होत आहे. मराठा समाजात बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाहीये. त्याचं नुकसान हे कोणाला आहे, हे मी सांगायची अजिबात गरज नाहीये. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार?, हे साधं राजकारण ज्याला समजतं. त्याला देखील हे समजतं, असं फडणवीस म्हणाले.

कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाहीये अशी घोषणा केली

आभार मानन्याकरीता युवराज छत्रपती संभाजीराजे मला भेटले होते. त्यापूर्वीच त्यांनी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाहीये अशी घोषणा केली होती. मी स्वतंत्र उभा राहणार आहे हे आधीच जाहीर केलं होतं. मला भेटल्यावर त्यांनी हेच सांगितलं. मी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. माझी अपेक्षा आहे, आमच्या घराण्याची परंपरा पाहता. ज्याप्रकारे मागच्यावेळी राष्ट्रपती कोट्यातून मला राज्यसभेत पाठवलं. तसंच सर्व पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा फाडला – संजय राऊत