घरमहाराष्ट्रobc reservation : निवडणूक आयोगाने सर्व जागांवर निवडणूक घ्यावी, छगन भुजबळ...

obc reservation : निवडणूक आयोगाने सर्व जागांवर निवडणूक घ्यावी, छगन भुजबळ यांची मागणी

Subscribe

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर २०२१ रोजी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) ४१३ जागांवरील निवडणुकांना स्थगिती दिली आहे. मात्र ओबीसी जागा वगळता एससी, एसटी आणि खुल्या प्रवर्गातील १ हजार ७०८ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजीच मतदान होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.

मात्र निवडणूक आयोगाने सर्व जागांवर निवडणूक घ्यावी अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी एका वेळी सगळी निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी, किंवा निवडणूक पुढं ढकलावी याबाबत निर्णय घ्यावा. असे मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

“सुप्रीम कोर्टाला विनंती असं पीसमिलमध्ये निवडणुक घेता येणार नाही. सगळ्या निवडणुका घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी. किंवा निवडणुका पुढे ढकलाव्यात. आम्ही तुम्हा इम्पिरिकल डाटा देतो किंवा सगळ्या निवडणुका घ्याव्या.”

जात पडताळणी प्रमाणं सगळ्या जागांवर निवडणूक व्हावी आम्ही त्यानंतर तुम्हाला इम्पिरिकल डाटा ताबडतोब सहा आठ महिन्यामध्ये तयार करुन देतो त्यासाठी राज्य सरकार प्रतिज्ञापत्र करणार आहे. आम्ही स्वत: देखील व्यक्तींच्या माध्यमातून आणि संघटनांच्या माध्यमातून न्यायालयात उभे राहणार आहोत. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह अनेक वकील उभे राहत आहेत. मी स्वत: यासर्वांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीला जात आहे. असं छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

- Advertisement -

ओबीसींच्या जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि सर्वसाधारण खुल्या गटातील जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. ओबीसींच्या जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

ओबीसींच्या ४१३ जागांवरील निवडणुका स्थगित
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद: २३ (एकूण जागा १०५)

भंडारा, गोंदियातील १५ पंचायत समित्या: ४५ (एकूण जागा २१०)

राज्यातील १०६ नगरपंचायती : ३४४ (एकूण जागा १, ८०२)

महानगरपालिका पोटनिवडणुका: १ (एकूण ४ जागा)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -