घरमहाराष्ट्रदिवा लावताना साडी पेटल्याने वृद्धेचा मृत्यू

दिवा लावताना साडी पेटल्याने वृद्धेचा मृत्यू

Subscribe

ही घटना सह्याद्रीनगर, सिडको येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरातील दिवा लावत असताना साडीच्या पदराचा दिव्याला धक्का लागल्याने साडीने पेट घेऊन या घटनेत ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नलिनी विष्णूपंत कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सह्याद्रीनगर, सिडको येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांच्या माहितीनुसार, नलिनी कुलकर्णी या मंगळवारी (दि.१९) सकाळी देवघरात दिवा लावण्यासाठी आल्या. दिवा लावत असताना त्यांच्या साडीच्या पदराचा पेटत्या दिव्याला धक्का लागला. पदर पेटल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत साडीने पेट घेतला होता. या घटनेत त्या ७० टक्के भाजल्या. उपचारासाठी त्यांना कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादारम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक धरम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -