घरताज्या घडामोडीओमायक्रॉनचे देशात १६१ रुग्ण

ओमायक्रॉनचे देशात १६१ रुग्ण

Subscribe

४२ रुग्णांनी केली मात * महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत एकूण या व्हेरिएंटने १६१ जणांना गाठले असून यातील ४२ रुग्णांनी ओमायक्रॉनवर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे जे रुग्ण आढळले आहेत त्यातील एकाही रुग्णामध्ये गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत आणि एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील १२ राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे १६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक ५४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत तर दिल्लीत ३२ आणि तेलंगणामध्ये २० जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यातील ४२ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात करण्यात यश मिळवले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ओमायक्रॉनमुक्त झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, तर त्यानंतर दिल्ली आणि कर्नाटकचा नंबर लागतो, असेही सांगण्यात आले.

- Advertisement -

कोणत्या राज्यात किती ओमायक्रॉन बाधित?
महाराष्ट्र – ५४
दिल्ली – ३२
तेलंगण – २०
राजस्थान – १७
गुजरात – १३
केरळ – ११
कर्नाटक – ८
उत्तर प्रदेश – २
तामिळनाडू – १
आंध्र प्रदेश – १
पश्चिम बंगाल – १
चंदिगड – १

देशात एकीकडे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ६ हजार ५६३ नवीन रुग्णांची भर पडली. रविवारच्या तुलनेत यात ७.३ टक्क्यांची घट पहायला मिळाली. २४ तासांत १३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्याचवेळी हजार ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. भारतात आता कोविड रिकव्हरी रेट ९८.३९ टक्के इतका असून मार्च २०२० नंतरचा हा सर्वाधिक रिकव्हरी रेट ठरला आहे. देशात आता कोरोनाचे ८२ हजार २६७ सक्रिय रुग्ण असून गेल्या ५७२ दिवसांतील हा निच्चांक आहे. हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -