…या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो; कपिल सिब्बलांची पुन्हा कोर्टात भावनिक साद

Misuse of ED, CBI; Opponents run to the Supreme Court

Maharashtra Political Issue | नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट जोरदार प्रतिवाद करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युक्तिवादात ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी आजही फेरयुक्तिवाद केला. आज युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी कोर्टाला भावनिक साद घातली.

सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास घटनेच्या तत्त्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले. पण त्याच प्रकरणाइतकंच हे प्रकरण महत्त्वाचं आणि प्रभाव पाडणारं आहे, असं भावनिक आवाहन कपिल सिब्बल यांनी केलं.

न्यायालयाच्या निकालाने लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला खात्री आहे की न्यायालयाने जर मध्यस्थी केली नाही तर लोकशाही धोक्यात येईल. अशाप्रकारे कोणतंच सरकार टीकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा, असं कपिल सिब्बल म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यापासून कपिल सिब्बलांनी अनेकदा वादळी युक्तिवाद केला आहे. जुन्या प्रकरणांचा दाखला देत, राजकीय आणि कायद्याचा अभ्यास करत त्यांनी युक्तिवाद केल्याने त्यांच्या प्रत्येक वाक्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.