घरCORONA UPDATEOmicron in mMaharashtra: दिलासादायक! राज्यात दीड वर्षाच्या मुलीची ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात

Omicron in mMaharashtra: दिलासादायक! राज्यात दीड वर्षाच्या मुलीची ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात

Subscribe

राज्यातील अनेक रुग्ण लवकरात लवकर बरे होत असल्याचे राज्याला मोठा दिलासा

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीने कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात केल्याची माहिती शनिवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दीड वर्षांच्या चिमुरडीने औषधांना चांगला प्रतिसाद दिला. चिमुकलीचे सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले तिची प्रकृती आता स्थिर असल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट किती घातक आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटचे राज्यातील अनेक रुग्ण लवकरात लवकर बरे होत असल्याचे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आणखी चार ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले होते. ज्यात एका तीन वर्षांची मुलाचा देखील समावेश होता. तीन वर्षाच्या मुलाने देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेले हे रुग्ण नायझेरियातून आलेल्या ओमिक्रॉन संक्रमित महिलेच्या संपर्कात आले होते.

- Advertisement -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनच्या पहिल्या ६ रुग्णांपैकी ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफा यांनी म्हटले आहे की, चार नवीन रुग्णांमधील एका तीन वर्षाच्या मुलामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तरीही त्या मुलाला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून चिंता करण्याची कोणतीही बाब नाही.

मुंबईच्या धारावी परिसरात देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केली आहे. धारावीत राहणाऱ्या ४० वर्षांचा व्यक्ती ४ डिसेंबररोजी पूर्व आफ्रिकेतील टांझानियामधून आला होता. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांसाठी दिलासादायक! मुंबईत आज शुन्य कोविड मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -