घरताज्या घडामोडी'महाविकास' आघाडी सरकारमधील मतभेत चव्हाट्यावर - प्रवीण दरेकर

‘महाविकास’ आघाडी सरकारमधील मतभेत चव्हाट्यावर – प्रवीण दरेकर

Subscribe

महाविकास आघाडी सरकार विशेषतः शिवसेनेतील नाराजी आणि मतभेद उघड झाले आहेत', अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

‘तीन पायाच्या ‘महाविकास’ आघाडी सरकारचा कारभार अजून पूर्णपणे सुरूही झालेला नसून अद्याप खातेवाटप देखील झालेले नाही, असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही हे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यातून महाविकास आघाडी सरकार विशेषतः शिवसेनेतील नाराजी आणि मतभेद उघड झाले आहेत’, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

मुळात काँग्रेस सोडून सत्तेसाठी शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा दावा ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला होता. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात घेऊन सेनेने त्यांची नैतिकता कुठल्या पातळीवर नेऊन ठेवली, हे दाखवून दिले होते. महाविकास आघाडी सरकार हे अंतर्गत नाराजीतूनच अडचणीत येईल आणि त्याची सुरुवात झाली आहे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

..यामुळे दिला राजीनामा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. खाते मिळण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा शिवसेनेच्या एका नेत्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. तसेच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होते, असे सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगू लागल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – खातेवाटपाची यादी आजच राज्यपालांकडे पाठवणार?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -