घरताज्या घडामोडीजैसी करनी वैसी भरनी; मुनगंटीवार याचं सूचक विधान

जैसी करनी वैसी भरनी; मुनगंटीवार याचं सूचक विधान

Subscribe

'आज दिवसभरात अशा बातम्या मिळतील', असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

आज (शनिवारी) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचं समोर येतं आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे सत्तार यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणाला नवं वळणं येणार असल्याचं दिसून येतं आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘भाजपनं कोणत्याही प्रकारची फुस लावल्याचा आरोप हा चुकीचा असून जैसी करनी वैसी भरनी असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. केवळ खुर्चीवर महाविकास आघाडीचं लक्ष आहे. तसंच खातेवाटपावरून महाविकास आघाडीत भांडण सुरू होत’, असं मुनगंटीवार म्हणाले. याच बरोबर ‘आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील’, असं सूचक वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

काँग्रेसमधून आमदारीकाचा राजीनामा देऊन अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्री पद देण्यात आलं. अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -