घरताज्या घडामोडीखातेवाटपाची यादी आजच राज्यपालांकडे पाठवणार?

खातेवाटपाची यादी आजच राज्यपालांकडे पाठवणार?

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे खातेवाटप कधी होणार त्याची चर्चा सुरू असताना आता महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांची बैठक सुरू असून, यावर आज शिक्कामोर्तब होणार अशी माहिती मिळत आहे. दरम्यान बैठकीनंतर आजच राज्यपालांकडे महाविकास आघाडीच्या खाते वाटपाची यादी पाठवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे खातेवाटप होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सह्याद्री अतिथीगृहवरची बैठक सुरू आहे. त्या बैठकीमध्ये काही चार जिल्ह्यांच्या पालक मंत्रिपदाचा वाद आहे तो वाद देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खातेवाटप आणि पालकमंत्रीपद वाटप यावर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

काँग्रेस राष्ट्रवादीची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली 

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खाते वाटपाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री आता ही यादी पाहून तिन्ही पक्षांची यादी राज्यपालांकडे पाठवतील. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात देखील आपला नियोजित दौरा सोडून सह्याद्री येथील बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बैठकीत खातेवाटपावर अंतिम तोडगा निघणार आहे.

- Advertisement -

माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल रात्री खातेवाटपावर अंतिम बोलणे झाले असून, आज खातेवाटप होण्यास कोणतीही अडचण नाही त्यामुळे आज खातेवाटप होऊ शकतो असं मला वाटते. अजित पवार, उपमुख्यमंत्री


हेही वाचा – अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत याचं मौन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -