घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी - दिलीप कांबळे

निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी – दिलीप कांबळे

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी करण्याचा आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सचिन सावंत यांच्या आरोपावर दिली आहे.

दारूच्या दुकानाचा परवाना देण्याकरीता २ कोटी पंधरा लाख रूपये लाच घेतली, अशी तक्रार करण्यात आली होती. मात्र ‘निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी करण्याचा आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे. संबधित व्यक्तीला मी कधीही भेटलेलो नाही. या विषयाशी माझा काहीही सबंध नाही’. औरंगाबादमध्ये सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले दिलीप कांबळे

‘अण्णाभाऊ साठे महामंडळामधील भ्रष्टाचार मी उघड केला होता. त्याचा राग मनात धरून माझ्यावर विरोधी पक्षाने खोटा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात अर्ज करून तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या माझ्यावरील षडयंत्राचा तपास केला जाईल. या व्यक्तीने सन २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे हा षड्यंत्राचा भाग असल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले आहे’.

- Advertisement -

वाचा – लाचखोर राज्यमंत्री दिलीप कांबळेची तात्काळ हकालपट्टी करा – सचिन सावंत

वाचा – २०१९ ची निवडणूक देशाची दिशा ठरवणार – सचिन सावंत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -