घरमहाराष्ट्रपवारांच्या फोटोंच्या जागी मोदींच्या फोटोंची ऑर्डर

पवारांच्या फोटोंच्या जागी मोदींच्या फोटोंची ऑर्डर

Subscribe

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक परिवारासह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर नवी मुंबईत राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपात राष्ट्रवादीची पडझड होत आहे. नाईक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फोटो हटवून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यासाठी ऑर्डर दिल्या गेल्याच्या चर्चा आहेत, तर राष्ट्रवादीचे घड्याळ काढून त्या जागेवर कमळ फुलवले जाणार आहे.

महापौरांच्या दालनातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांचे फोटो काढून त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यासाठी ऑर्डर देण्यात आली असल्याची चर्चा आहे. पक्ष प्रवेशानंतर नेत्यांचे आदेश येताच सर्व बदल केले जाणार आहेत. त्यामुळे मंगळवारची महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणण्याची अखेरची वेळ येऊन ठेपली आहे. या पक्ष प्रवेशानंतर महापालिकेतील समीकरण बदलणार असून भाजप महापौर जयवंत सुतार तर विरोधी पक्षनेते शिवसेनेचे विजय चौगुले अशी म्हणण्याची वेळ नगरसेवकांवर येणार आहे.

- Advertisement -

भाजपचे महापालिकेतील गटनेते रामचंद्र घरत यांचे पदही धोक्यात येणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून नाराज झालेल्या पदाधिकारी व नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -