Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Oxygen Shortage : ठाकरेंची मागणी मोदींकडून मान्य, ऑक्सिजन टँकर एअर लिफ्टिंगला IAF...

Oxygen Shortage : ठाकरेंची मागणी मोदींकडून मान्य, ऑक्सिजन टँकर एअर लिफ्टिंगला IAF मार्फत सुरूवात

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा वाढता उद्रेक पाहता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रुग्णांसाठी बेड्स ऑक्सीजन सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सरकारपुढे मोठे आव्हान तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे कोरोना रुग्णांना  वैद्यकीय ऑक्सीजन लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मोदी सरकारने मागणी मान्य कारून भारतीय हवाई दलाकडून रिकाम्या ऑक्सीजन कंटेनरची विमानाने वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोव्हिड -१९  विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सीजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोव्हिड -१९ विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्ट्रातिल रिक्त ऑक्सीजन कंटेनर ऑक्सीजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.आज २४ एप्रिल २०२१  रोजी सकाळी ८:००  वाजता  हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या  एका सी -१७ विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने  उड्डाण केले. सकाळी १०:००  वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करणारे  रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी  विमानातून  नेत आहेत . हे विमान पुण्याहून सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी १:३० वाजेपर्यंत जामनगर हवाईतळावर उतरवण्यात आले.भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या  आणखी एका   सी -१७  विमानाने आज पहाटे २  वाजता  सिंगापोर येथील चांगी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी ०७:४५ वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले. क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचे चार कंटेनर भरल्यानंतर  ते सिंगापोरहून उड्डाण करेल   आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर  दाखल होईल आणि संध्याकाळपर्यंत  कंटेनर उतरविण्यात येतील.


- Advertisement -

हे हि वाचा – १०० कोटी वसूली प्रकरणात इतर पाच अनोळखी आरोपी कोण?

- Advertisement -