घरट्रेंडिंगकॅम्पमध्ये गेले, अन् १३४ पाकिस्तानी करोना घेऊन आले

कॅम्पमध्ये गेले, अन् १३४ पाकिस्तानी करोना घेऊन आले

Subscribe

करोनामुळे जगभरात दररोज करोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या आकड्यात भर पडत आहे. पण भारताचा पक्का शेजारी असणाऱ्या पाकिस्तानने मात्र करोनाच्या बाबतीत मात्र बाजी मारली आहे. भारताला मागे टाकत करोना पॉझिटिव्हचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकाच दिवसात पाकिस्तानात १३१ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात मोठ्या संख्येने नवीन रूग्ण आढळून आले आहेत. भारतातील १२४ करोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येला मागे टाकत आता पाकिस्तान आघाडीवर पोहचले आहे. पाकिस्तानात एकुण १८४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यूही करोनामुळे झालेला आहे.

पंजाबमध्ये पहिला करोनाचा रूग्ण आढळला होता. दुबईतून लाहोरमार्गे पाकिस्तानात आलेल्या रूग्णाची करोनासाठीची म्हणून पहिल्या रूग्णांची नोंद झाली आहे. एका खाजगी लॅबमध्ये त्याने उपचाराची सुरूवात केली. पण तो अधिकच आजारी पडल्याने आता त्याला पाकिस्तानातील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पाकिस्तानाच एकाचवेळी १३४ जणांनी इराणमध्ये तफ्तान बॉर्डर क्रॉसिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या या सगळ्यांना करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. पण तफ्तान कॅम्पमधून आलेल्यांचे स्क्रिनिंग योग्य पद्धतीने न केल्यानेच हा आकडा एकाएकी वाढल्याचे निदर्शनास आलआ आहे. एकाच कॅम्पमध्ये शेकडो लोकांची राहण्याची व्यवस्था असल्यानेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना करोनाची लागण झाल्याचे आता उघढ झाले आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांमध्ये करोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडणार आहेत. गेल्या २४ तासांमध्ये जगभरात ६३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक करोनाचे रूग्ण हे इटलीमध्ये आहेत. इटलीमध्ये २४ तासांत ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये मात्र मत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. काल चीनमध्ये कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम इराणवर झाला आहे. इराणमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात मृतांचा आकडा ७ हजारांवर पोहचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -