घरताज्या घडामोडीपालघर मॉब लिंचिंग प्रकरण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र पोलिसांना नोटीस

पालघर मॉब लिंचिंग प्रकरण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र पोलिसांना नोटीस

Subscribe

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना नोटीस जारी केली आहे. १६ मार्चला पालघरमध्ये दोन संतांसह तीन जणांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये पाच आरोपींची ओळख पटली आहे. यात जयराम भावर (वय २५), महेश सीताराम रावते (वय १९), गणेश देवजी राव (वय३१), रामदास रुपजी असारे (वय २७) आणि सुनील सोमजी रावते (वय २५) यांचा समावेश आहे. यांच्यावर कलम ३०२ हत्या, १२० (बी), ४२७, १४७, १४८, १४९ आणि १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींसह ४०० ते ५०० लोकांच्या जमावविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले?

सुशील गिरी महाराज (वय ३५), चिकणे महाराज (वय ७०) आणि चालक निलेश तेलगडे (वय ३०) हे इको कारने गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईतील कांदिलवलीहून सूरतकडे निघाले होते. त्यांना पोलिसांनी प्रवासासाठीचा कोणाताही पास नसल्याने चारोटी टोलनाका येथून माघारी पाठवले. मात्र त्यांना सूरत गाठायचे होते. म्हणून ते विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे जात असताना दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मात्र त्याठिकाणी जमलेल्या जमवाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळेस पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावातील लोकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिस तिथे काहीच करू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना कसेबसे आपल्या गाडीत बसवले. मात्र त्यानंतर जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. पोलिसांनी आपली कशीबशी सुटका केली मात्र या तीन जणांची जमावाने निघृणपणे हत्या केली.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात आजपासून निषेध


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -