घरमहाराष्ट्रभूमिगत रस्त्यासाठी लांजेकरांचा मतदानावर बहिष्कार

भूमिगत रस्त्यासाठी लांजेकरांचा मतदानावर बहिष्कार

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. यावेळी भुयारी मार्ग न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय लांजेकरांनी घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग मिळावा या मागणीबाबत ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष व त्यामुळे भुयारी मार्ग न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील नांदिवली, शिरंबवली, मठ, निवसर, असोडे, पुनस कोंड, असोडे, कुर्णे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. त्यामुळे काही गावांचे विभाजन झाले आहे. महामार्गाशेजारी वसलेल्या लांजा तालुक्यातील दहा गावांतील जनतेला भातशेती, गुरेढोरे रस्त्यापलीकडे नेण्यासाठी त्याचप्रमाणे विद्यार्थी, ग्रामस्थांना बसथांब्यानजीक रस्ता ओलांडण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाखालून रस्ता (अंडरग्राऊंड रोड) उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नव्हते. आपली न्याय्य मागणी ग्रामपंचायतींच्या ठरावासह संबंधित अधिकार्यांना देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवून या प्रश्नाबाबत आपली जबाबदारी झटकण्याच्या प्रकाराबाबत संतापलेल्या ग्रामस्थांनी महामार्गावरच उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

- Advertisement -

ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन गडकरी यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना केल्या होत्या. मात्र कार्यकारी अभियंता दिलेल्या आदेशाचे पालन करत नाहीत. वेळोवेळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन देखील कार्यवाही झालेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -