तुळजाभवानी मंदिरात संबळ, गोंधळ पुजेला परवानगी

तुळजाभवानीच्या मंदिरात शेकडो वर्षांपासून संबळ आणि गोंधळ पुजेची परंपरा आहे

Permission for Sambal, Gondhal Puja in Tulja Bhavani Temple osmanabad

तुळजापूरच्या तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले तेव्हापासून मंदिरात कोरोनाच्या नियमांचे पालन करुन भविकांना दर्शनासाठी आत सोडण्यात येत होते. संबळ, गोंधळाला तुळजाभवानीच्या मंदिरात विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोना निर्बंधामुळे सर्व बंद ठेवण्यात आले होते. मात्र आज पासून पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिरात संबध, गोंधळ पुजेला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार करुन नियमांचे पालन करुन मंदिर प्रशासनाने ही परवानगी दिली आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात शेकडो वर्षांपासून संबळ आणि गोंधळ पुजेची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या काळात ही पंरपरा खंडीत झाली होती.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिर उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. या काळात तुळजाभवानीच्या मंदिरात दररोज १५ हजार भविकांना दर्शन देण्यात येत होते. सुरुवातीच्या काळात ३० हजार भविकांना दर्शन दिले जाईल असे लेखी आदेश काढण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी या आदेशात बदल करुन १५ हजार भविकांच्या दर्शनाला परवानगी देण्यात आली.

तुळजाभवानीचे मंदिर जागरण, गोंधळ, संबळ यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. देवीच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरुन कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक येत असतात.

तुळजाभवानी देवीच्या वार्षिक विधीच्या वेळी त्याचप्रमाणे नवरात्र, घटस्थापने सारख्या धार्मिक विधींच्यावेळी संबळाची आवश्यकता असते. लाकडी तसेच पितळीची संबळ किंवा हल्ली बऱ्याच जणांकडे स्टिलची संबळ देखील पहायला मिळते. तुळजाभवानी देवीच्या सकाळी व संध्याकाळच्या अभिषेकावेळी प्रामुख्याने संबळ वाजवली जाते.


हेही वाच – उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी