घरमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था 'गजनीतील आमिरसारखी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था ‘गजनीतील आमिरसारखी’

Subscribe

पाच वर्षांत मोदींनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था आज गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे. अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी  केली आहे.

परिवर्तन यात्रेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्ला चढवला. पाच वर्षांत मोदींनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था आज गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे. अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी  केली आहे. पालघरमधील विक्रमगड येथे परिवर्तन यात्रेदरम्यान त्यांनी ही टीका केली आहे. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल’ अशी टीका देखील यावेळी मुंडे यांनी केली आहे.

निवडणुकीत आता वेगवेगळी आश्वासने दिली जातील. या आश्वासनांना बळी पडू नका असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनतेला केले. चार वर्षे सत्ता भोगली. परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र केला नाहीत उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केले. अशी टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली आहे. चार वर्षात महाराष्ट्र लुटला आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही असा इशारा देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे. आता मोदी लाट ओसरली आहे. आता जनता तुम्हाला बाहेर फेकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

वाचा – ‘जनतेसोबत धन की बात, अदानी, अंबानी सोबत धन की बात’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -