घरताज्या घडामोडीPM Modi Security Breach: भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला?, नवाब...

PM Modi Security Breach: भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला?, नवाब मलिकांचा भाजपला सवाल

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत भाजपची कोंडी केली आहे. या भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जीपणा झाला. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. पंजाब सरकार आणि राज्यातील पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी असताना असा हलगर्जीपणा कसा झाला? असा प्रश्न निर्मण झाला आहे. मोदींचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला होता त्याचे व्हिडीओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. यामध्ये आता आणखी एक व्हिडीओ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पोस्ट करत भाजपवर पलटवार केला आहे. मोदींच्या ताफ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक कसे पोहोचले असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पंजाबमध्ये सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा आहे. मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका उड्डाणपुलावर रोखला होता. ताफा जाणूनबुजून रोखण्यात आला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र नावब मलिक यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये भाजपचेही समर्थक तिथे घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मोदींच्या ताफ्याजवळ भाजप समर्थक असल्यामुळे विरोधकांकडून आता भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत भाजपची कोंडी केली आहे. या भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या व्हिडीओत भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या गाडीजवळ आहेत. तर आंदोलनकारी शेतकरी मात्र मोदींच्या ताफ्यापासून खूप दूर आहेत. तरिही भाजपकडून खोटे आरोप आणि नाटक करण्यात येत असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.

- Advertisement -

नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला आहे. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.


हेही वाचा : PM Modi Security Breach: मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी, चौकशीत NIA ला सहकार्याचे निर्देश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -