घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींचा वाढदिवस, राष्ट्रवादीने केक कापत केले ‘एप्रिल फुल’

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, राष्ट्रवादीने केक कापत केले ‘एप्रिल फुल’

Subscribe

महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर केक कापत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्याचे आश्वासन देत पंतप्रधानांनी देशातील जनतेची फसवणूक केल्याने पंतप्रधानांनी खर्‍या अर्थाने जनतेला ‘एप्रिल फुल’ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा ‘एप्रिल फुल’ आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.

यावेळी मोदींचा जन्मदिवस म्हणजे एप्रिल फुल दिवस असा फोटो असलेला प्रतिकात्मक केक गाजराने कापून हे आंदोलन करण्यात आले. विनयनगर येथील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, शादाब सैय्यद, जय कोतवाल, डॉ. संदिप चव्हाण, सुनिल घुगे, सोनू वायकर, राहुल कमानकर, सागर बेदरकर, रेहान शेख, संतोष गोवर्धने, तुकाराम फसाटे, नीलेश खोडे, अभिषेक सराफ, यश खरात, धीरज साळवे, रोहन साळवे, चैतन्य खरात, कन्नूर शहा, मयूर लोखंडे, शहात अरब, अमोल जाधव, विक्की गांगुर्डे, मयूर निकम, रजा शेठ , सचिन झोले, आदिल खान, नदिम शेख, वाजिद शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -