घरताज्या घडामोडीAnandrao Adsul: आनंदराव अडसूळांना दिलासा नाहीच, न्यायालयाने फेटाळला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज

Anandrao Adsul: आनंदराव अडसूळांना दिलासा नाहीच, न्यायालयाने फेटाळला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज

Subscribe

शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यांच्यावर सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. अडसूळ यांचा पुढील सुनावणीपर्यंत अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला ठेवली आहे. सिटी सहकारी बँकेत ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार करण्यात आली असून याच प्रकरणात अडसूळ यांच्यावर ईडीची चौकशी सुरु आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये ईडीचे पथक दाखल झाले होते. चौकशी सुरु असताना अडसूळ यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकीकडे अडसूळ यांनी कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. अडसूळ यांच्या जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस. सतभाई यांनी आनंदरराव अडसूळांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच यावर पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

- Advertisement -

आनंदरराव अडसूळ यांनी पीएमएलए कोर्टासमोर अटकपूर्व जामीनासाठी रितरसर अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करण्यात येत असताना ईडीकडून जोरदार विरोध करत बाजू मांडण्यात आली. यामुळे न्यायालयाने ईडीला बाजू मांडण्यासाठी अधिक वेळ दिला असून अडसूळांची पुढील सुनावणीपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जाची मागणी फेटाळली आहे.

आनंदरराव अडसूळ यांच्या घरी ईडीचे पथक पोहचले होते. त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर अडसूळ यांनी ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयात सादर केला होता तेव्हाही खंडपीठाने हा अर्ज फेटाळत विशेष पीएमएलए न्यायालयात रीतसर अर्ज करण्याचा सल्ला दिला होता.

- Advertisement -

सिटी सहकारी बँक प्रकरण काय आहे?

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.


हेही वाचा : Amravati Violence: अमरावतीचा दौरा रद्द करा, किरीट सोमय्यांना अमरावती पोलिसांची नोटीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -