घरक्राइमकल्याणमध्ये महिलेकडून पोलिसांना शिवीगाळ

कल्याणमध्ये महिलेकडून पोलिसांना शिवीगाळ

Subscribe

आमदारांची बहिण असल्याचा बनाव

कल्याण । कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षा चालकाबरोबर एका महिलेचे भाडे देण्यावरुन भांडण झाले. रस्त्यावर भांडण झाल्याने प्रवासी महिला, एक रिक्षा चालक यांना पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले. या महिलेने मला पोलीस ठाण्यात का आणले आहे? असे बोलून उपस्थित महिला पोलिसांना शिवीगाळ, त्यांना मारायला धावण्याचे प्रकार केले. आपण एका आमदाराची बहिण आहोत. तुम्हाला सगळ्यांना बघू घेते, अशी धमकी या महिलेने रिक्षा चालक, पोलिसांना दिली.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात बुधवारी हा गोंधळ या महिलेने घातला होता. या महिलेला पोलिसांनी तिचे नाव विचारले तर ‘तुम्ही मला नाव विचारणारे कोण, तुमची लायकी आहे का मला काही विचारण्याची? तुम्ही मला शांत राहण्यास सांगणारे कोण’ असे अर्वाच्च भाषेतील प्रश्न उपस्थित करुन महिलेने महिला पोलिसांना मारहाण करण्यास धावणे, त्यांना शिवीगाळ केली आणि नखांनी बोचकारे घेतले. उपस्थित रिक्षा चालकाला शिवीगाळ करणे असे प्रकार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

एक तास चाललेल्या या गोंधळानंतर महिलेने आपले नाव प्रीती कपील त्रिभुवन (३२) असे सांगितले. अतिशय संतप्त झालेल्या महिलेला इतर महिला पोलीस शांत राहण्यास सांगत होत्या. त्यांचेही प्रीती ऐकत नव्हती. त्यांना ती मारहाण करण्यास धावत होती. श्रीकांत मिश्रा या रिक्षा चालकाबरोबर तिचा वाद झाला होता. तो रिक्षा चालक पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मिश्राची तक्रार करण्याऐवजी महिलेने रिक्षा चालकाला फैलावर घेऊन तुझ्यामुळे मला पोलीस ठाण्यात यावे लागले. मला मनस्ताप झाला, असे ओरडून बोलू लागली. अखेर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी पोलीस वाहनात बसताना या महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या महिलेला पाहण्यासाठी पादचार्‍यांनी गर्दी केली होती. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून महिला पोलीस शीला अंकुश बंदावणे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्रीती विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -