घरमहाराष्ट्रप्रजासत्ताक दिनी पोलिसाची आत्महत्या, चंद्रपूरातील घटना

प्रजासत्ताक दिनी पोलिसाची आत्महत्या, चंद्रपूरातील घटना

Subscribe

पुलाखाली मृतदेह आढळल्याने पोलीस दलात खळबळ

प्रजासत्ताक दिन साजरा करुन आल्यानंतर एका पोलिसाने आत्महत्या केल्याच्या घटनेने चंद्रपूर शहर हळहळ व्यक्त करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मंगेश जक्कुलवार यांनी ड्युटी संपवून आल्यानंतर विष घेऊन आत्महत्या केली.

२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंगेश हे पोलीस शिपाई रात्री उशिरा पोलीस ठाण्यात रुजू झाले. सकाळी घरी देखील परतले. पण, त्यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह राजुरा ते बल्लारपूर या शहरादरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली निर्जन शेतशिवारात आढळून आला. अचानक या घटनेची माहिती मिळताच मंगेश यांच्या कुटुंबियांना आणि पोलीस विभागाला धक्का बसला आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकेबंदी करत घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे. मंगेश यांनी अचानक केलेल्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंगेश यांना एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? किंवा ही आत्महत्या की हत्या याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

कोण होते मंगेश जक्कुलवार ?

मंगेश हे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय? त्याच्या अंगावरील कपड्यांमध्ये एखादी सुसाइड नोट सापडली का? याविषयी देखील पोलिसांनी अजूनही कोणती स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. पण, या घटनेचा तपास लवकर लागावा यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -