‘त्या’ प्रकरणी शिवसेनेच्या 2 नेत्यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर शवसेनेत उभी फुट पडली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदेगटातील आमदरांवर टीका केली जात आहे. तसेच, काही आमदारांना आक्रमक इशारेही देण्यात आले होते.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर शवसेनेत उभी फुट पडली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदेगटातील आमदरांवर टीका केली जात आहे. तसेच, काही आमदारांना आक्रमक इशारेही देण्यात आले होते. अशीत एक घटना नांदेडमध्ये घडली होती. नांदेजमध्ये शिवसेना नेत्यांकडून बंडखोरांना आक्रमक इशारा देण्यात आला होता. नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांना हा इशारा दिला होता. मात्र शिंदे गटातील आमदारांना इशारा देणे या दोघांना महागात पडले असून, पोलिसांनी आठ दिवसासाठी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. (polie deportation notice to 2 shiv sena leaders due to Giving aggressive warning to rebel mlas)

आमदारांच्या बंडळीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. याच पार्श्वभूमीवर ‘बंडखोरांच्या गाड्या फोडू अन् तोंडाला काळेही फासू’, असे वक्तव्य सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले होते.

याप्रकरणी प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांना 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात, शहरात राहण्यास आणि फिरण्यास, संपर्क करण्यास प्रतिबंध करणारी नोटीस पोलीस अधीक्षकांनी बजावली आहे. तसेच, प्रतिबंध का करण्यात येऊ नये, याबाबत 2 दिवसांत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकारण सुरू आहे. तसेच, निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि खासदारांशी वाद होऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असे कारण देत पोलिसांनी प्रकाश मारावार आणि कोकाटे यांना नोटीस दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगत असून काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत.


हेही वाचा – अरबी समुद्रात बुडाले भारताचे जहाज; पाकिस्तानच्या नौदलाने वाचवला 9 क्रू मेंबर्सचा जीव