घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रदूषणमुक्तीचे दावे फेल; गोदावरी नदी आणि खोर्‍यातील शेतीचे अस्तित्व धोक्यात

प्रदूषणमुक्तीचे दावे फेल; गोदावरी नदी आणि खोर्‍यातील शेतीचे अस्तित्व धोक्यात

Subscribe

नाशिक : प्रशासनाकडून वेळोवेळी प्रदूषण मुक्तीचे दावे केले जात असले तरीही गोदावरीला पडलेला प्रदूषणाचा फास पाहता हे दावे सपशेल फोल ठरल्याचेच स्पष्ट झाले आहे. आपलं महानगरच्या टीमने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आजही नदीत रसायनांमुळे प्रचंड फेस कायम असल्याचे दिसून आले.

गोदावरी नदीत कुठल्याही प्रकारे विषारी पाणी तसेच, ड्रेनेजचे पाणी सोडले जात नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. शहरापासून पुढे गोदावरी प्रवाहित होते. त्या गावांमधील गोदावरीची परिस्थिती पाहता वास्तव अत्यंत भीषण असल्याचे दिसून आले. ओढा गावाजवळून वाहणार्‍या गोदावरी नदीत फेसाळलेल पाणी, उग्र दर्प आणि पाण्याला अक्षरशः काळा रंग असल्याचे दिसले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगा योजनेंतर्गत गंगा नदी स्वच्छतेसाठी आणि त्यासोबत देशभरातील प्रमुख नद्या स्वच्छ करण्यासाठी व त्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. तशा सूचना त्या-त्या प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चदेखील केले जात आहेत. खासगी कारखान्यांना प्रदूषणाबाबत अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र, दुर्दैवाने या सर्व बाबी कागदावरच आहेत की काय, अशी परिस्थिती गोदावरी नदीला प्राप्त झालेल्या स्थितीवरुन दिसते आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून गोदावरी नदी जसजशी पुढे जाते तसतशी गोदावरी नदीच्या प्रदूषणाची भीषणता लक्षात येते. नाशिक महानगरपालिकेपासून थोड्या अंतरावर असलेल्या ओढा गावाला आपलं महानगरच्या प्रतिनिधींनी भेट दिली त्यावेळी गोदावरी नदीची परिस्थिती किती भीषण आहे, हे दिसून आले.

गोदावरी नदीच्या बाजूला वसलेल्या गावांमधील शेतीसह मानवाचे आरोग्य किती धोक्यात आले आहे, हेदेखील या भेटीत स्पष्ट झाले. गोदावरी नदी किंवा तिच्या आजूबाजूच्या गावांतील शेतीचे अस्तित्वदेखील या प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. गोदावरीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात फेस आलेला आहे. यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते आहे तसेच, आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्ये त्वचा किंवा श्वसनाचे विकारांसारख्या अनेक आजारामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. केवळ नदीचेच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील विहिरींमधील तसेच बोअरिंगमधील पाणीसुद्धा यामुळे प्रदूषित झालेले आहे. यातील क्षारांचे प्रमाण तर तब्बल १ हजारांवर ही वर गेल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले.\

- Advertisement -

पवित्र गोदावरी नदीच्या या दूरवस्थेला नेमका दोषी कोण, कारखान्यांमधून निघणारा विषारी पाणी कुठल्याही प्रकारे प्रक्रिया न करता नदीत मिसळल्या जात असल्याचा हा पुरावा असल्याचे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. हे विषारी पाणी थेट नदीमध्ये मिसळत असेल तर मग न हरकत दाखला प्रदूषण विभागाच्या माध्यमातून कसा दिला जातो, नेमका हा कारभार कसा चालतो याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यासोबत अब्जावधी रुपये खर्च करून नाशिक महानगरपालिकेने जे मलनिस्सारण केंद्र उभारला आहे त्यामुळे निसर्ग केंद्रामध्ये कशा पद्धतीने कारभार सुरू आहे. तिथे खरोखर सिव्हरेज पाण्यावरती योग्य ती प्रक्रिया होते आहे की नाही, याबाबतही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

गोदावरी आपली माता आहे. आम्ही अनेक वर्षांपासून याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. शेतकर्‍यांनाही त्रास होतो आहे. जनावरांना किंवा शेतीसाठी हे पाणी आता उपयुक्त राहिलेले नाही. अक्षरशः दशक्रिया विधीसाठीसुद्धा टँकरने पाणी आणावे लागते. यावर ठोस उपाययोजना करावी अन्यथा गोदावरीचे अस्तित्वच संपेल. : प्रिया पेखळे, सरपंच, ओढा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -