घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्या विरोधात भाजयुमो आक्रमक; पुतळ्याला जोडे मारत केले आंदोलन

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्या विरोधात भाजयुमो आक्रमक; पुतळ्याला जोडे मारत केले आंदोलन

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजीमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथील जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रविवारी (दि.५) आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारुन त्यांचा निषेध करण्यात आला. रविवार कारंजा भागात हे आंदोलन करण्यात आले.

इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार, याचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. यापूर्वीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगकाठीवरून आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे. ते वक्तव्य महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. त्यानंतरही आव्हाड यांनी हे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. एकीकडे 19 फेब्रुवारी या दिवशी शिवरायांचा जयंती सोहळा साजरा करण्याची महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे आव्हाडांनी हे वादग्रस्त विधान करून शिवप्रेमींना डिवचले आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चा नाशिक महानगराचे अध्यक्ष अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा येथे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनादरम्यान आमदार आव्हाड यांचा तीव्र शब्दांत निषेध करत त्यांनी माफी मागावी, अशी आग्रही मागणी युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी केली. या आंदोलनाप्रसंगी अमित घुगे, योगेश मैंद, भैरवी वाघ, अनिकेत पाटील, विजय बनछोडे, अंकित संचेती, सचिन तांबे, हर्षद जाधव, निखिलेश गांगुर्डे, प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, पवन उगले, प्रसाद धोपावकर, साक्षी दिंडोरकर, आदित्य केळकर, पवन गुरव, गोपी राजपुत, अक्षय गांगुर्डे, गणेश मोरे, विजय गायखे, एकनाथ नवले, राम बडगुजर, प्रज्वल जोशी, संदीप दोंदे, विनोद येवले, हर्षद वाघ आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -