घरमहाराष्ट्र'नेमाडे दारु पिऊन कादंबरी लिहितात' पूजाची फेसबुकवरील शेवटची वादग्रस्त पोस्ट

‘नेमाडे दारु पिऊन कादंबरी लिहितात’ पूजाची फेसबुकवरील शेवटची वादग्रस्त पोस्ट

Subscribe

लेखक भालचंद्र नेमाडेंवर गेले गंभीर आरोप

राज्यात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राजकारणात वादंग निर्माण झाले आहे. याप्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा थेट जवळचा संबंध असल्याच्या चर्चांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिच्या अनेक सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होत आहेत. यातील पूजाची शेवटी फेसबुक पोस्ट सध्या सर्वाधिक व्हायरल होत आहे. कारण पूजाने या शेवटच्या पोस्टमधून मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. या पोस्टमधील पूजाने वापरलेली भाषा पाहून आता अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूजा चव्हाणचे फेसबुकवर पूजा लहू चव्हाण या नावाने अकाऊंट आहे. या अकाउंडवरील शेवट्या पोस्टमधून पूजाने साहित्यिक कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्यावर वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने, 8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजीनिअरिंगमध्ये येवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध करत आहे आणि हा नालायक खान्देशी लेखक “भालचंद्र नेमाडे” देशी दारू पिऊन त्यावर कादंबरी लिहीत आहे… असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध… अशा वादग्रस्त शब्दात पूजाने नेमाडेंवर टीका केली. १८ जानेवारी २०२१ रोजी पूजाने ही फेसबुक पोस्ट शेअर केली होती.

8 हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा,जहाज बांधणी,इंजिनिअरिंग मध्ये येवढी उन्नत कशी इतिहासकार ह्याचा शोध…

Posted by Pooja Lahu Chavan on Monday, 18 January 2021

- Advertisement -

भालचंद्र नेमाडे मराठी साहित्य विश्वातील कादंबरीकार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यामुळे अशा साहित्यिकाच्या साहित्याबद्ल आक्षेप व्यक्त करताना शब्द जपून वापरने गरजेचे होते. मात्र पूजाने आपल्या पोस्टमध्ये नेमाडेंविषयी नालायक, मतिमंद, देशी दाऊ पिऊन कादंबरी लिहितो अशा शिवराळ शब्दात आक्षेप व्यक्त केल्याने तिच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्य क्षेत्रातील अनेक लेखक कवी पूजाच्या या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया देत आहे. कवी बालाजी सुतार यांनीही या पोस्टवर आपले मत व्यक्त केलं आहे. या फेसबुक अकाउंटवर पूजाचे २६ हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. या अकाऊंटवर तिने आईवडील आणि संजय राठोड यांच्यासोबतचा एक फोटो ठेवला आहे. मराठी साहित्य विश्वास भालचंद्र नेमाडे हे नाव सर्वज्ञात आहे. १९६३ साली नेमाडेंनी लिहिलेल्या कोसला या कादंबरी मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर त्यांची बिढार, हूल, जरीला, झूल असे अनेक साहित्य आजही लोकप्रिय आहे.


हेही वाचा- निवार, रविवार मार्केट बंद; नागपूरची नवी नियमावली जाहीर

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -