मविआने मंजुरी दिलेल्या पर्यटन विकासकामांना शिंदे सरकारकडून स्थगिती

आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने 381 कोटी 30 लाख 71 हजार रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022-2023 ला मंजुरी दिली होती.

cm eknath Shinde

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने मागील काही महिन्यांच्या काळात अनेक निर्णय घेतले आहेत पण असे असले तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विभागाकडून घेण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाला शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआधी या कोट्यवधींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांची 381 कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबत शिंदे सरकार संभ्रमात आहे. मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी (cm eknath shinde) या योजनेला स्थगिती दिली होती. त्यानंतर 2022-2023 सोबतच मागील वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला होता पण, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा जीआर जारी करून 2 नोव्हेंबरच्या जीआरला स्थगिती दिली आहे. पर्यटन विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली गेल्याने एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना (aditya thackeray)धक्का दिला असे बोलले जात आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने 381 कोटी 30 लाख 71 हजार रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022-2023 ला मंजुरी दिली होती. यानुसार राज्याच्या विविध जिल्ह्यात पर्यटनासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार होत्या. 28 जून 2022 च्या शासनच्या निर्णयात 381.30 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन 169.64 कोटी रुपयांच्या कामाचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस (shinde – fadnavis) सरकार सत्तेत आली आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली. शिंदे – फडणवीस सरकारने 25 आणि 28 जुलै 2022 रोजी शासन निर्णय जारी करुन या योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावरील 381.30 कोटी त्याचसोबत एमटीडीसीचे 214.80 कोटी असे एकूण 596 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यासोबत पुढील शासन आदेश मिळेपर्यंत कोणतीही कारवाई करू नका अश्या सूचना सुद्धा देण्यात आल्या.


हे ही वाचा – राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात सापडले निनावी पत्र