घरताज्या घडामोडीअग्निपथ या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

अग्निपथ या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Subscribe

अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशातील चार राज्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि तेलंगणात अग्निपथ योजनेविरोधात जोरदार आंदोलनं करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या योजनेला आता राजकीय स्तरावर मोठा विरोध होताना पहायला मिळत आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांच्यापूर्वी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. २०२४ च्या निवडणुकीत अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भिती भाजपाला आहे.अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणुक महत्वाची हे मोदीजींचे धोरण चुकीचे आहे, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा : बोरिवलीतील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचं आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण, आता होणार सुरक्षित प्रवास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -