घरमुंबईअजगराच्या अंड्यांना घरातच कृत्रिम पद्धतीने उबवले, पिल्लांना सोडणार नैसर्गिक अधिवासात

अजगराच्या अंड्यांना घरातच कृत्रिम पद्धतीने उबवले, पिल्लांना सोडणार नैसर्गिक अधिवासात

Subscribe

मुंबईतील कलिना कॅम्पसमध्ये राहणारे सर्पमित्र अमान खान (२०) यांच्या घरात एक ते दीड फुटांच्या १६ नवीन जीवांनी जन्म घेण्यास सुरुवात केली आहे. हे १६ जीव अजगराची (मादी) पिल्ले आहेत. अमान खान यांच्या घरात एका थर्माकोलच्या बॉक्समध्ये १० मे पासून कृत्रिम व पोषक असे वातावरण निर्माण केल्यानंतर या शुक्रवारपासून अजगराच्या अंड्यांमधून एकेक करून अजगराची एक ते दीड फुटांची पिल्ले बाहेर पडू लागली आहेत. त्यांना बघायला अमानच्या घरात बघ्यांची गर्दी होत आहे. मात्र, सर्प व प्राणी प्रेमी अमान त्या अंड्यांची व अजगराच्या पिल्लांची जीवापाड काळजी घेत आहे.

आपल्या भारत देशात यापूर्वी उडीसा व मद्रास या दोन ठिकाणी अजगर, सापांच्या अंड्यांना कृत्रिम पद्धतीने पोषक वातावरण निर्माण करून अंडे उबवून त्यातून सापांच्या पिल्लांनी जन्म घेण्याची ही महाराष्ट्रात व मुंबईत पहिली तर देशातील तिसरी घटना आहे. वास्तविक, या सर्व घटनाप्रकारामागील खरी हकिकत मुंबई महापालिका सुरक्षा दलात कार्यरत सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या भांडुप संकुल येथील जंगलात बिबट्या, वाघ, साप, अजगर, काळवीट, सशे असे अनेक प्राणी राजरोसपणे वावरत असतात. मात्र, एका अजगराने (मादी) काही अंडी भांडुप संकुलातील नाल्याच्या ठिकाणी उघड्यावर घातल्याचे १० मे रोजी सर्पमित्र हसमुख वळंजू (२९) यांना आढळून आले. त्यांनी त्यांचा सांताक्रूझ, कलिना कॅम्पस येथे राहणारा सर्प मित्र अमान खान (२0) यांना कळवले. सर्प मित्र सर्पमित्र अमान खान यांनी त्या अंड्यांना कोणी नुकसान पोहोचविण्यापूर्वीच वन खात्याच्या परवानगीने त्यांना तेथून हलवून घरी आणले. त्या अंड्यांना थर्माकोलचया मोठ्या बॉक्समध्ये ठेवले व त्यात कृत्रिम वातावरण निर्माण केले.

- Advertisement -

शुक्रवारपासून त्या १७ पैकी एक नासके अंडे वगळता १६ अंड्यांमधून अजगराच्या पिल्लांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे. शनिवारपर्यत पहिला ‘किंग बेबी’ व नंतर आणखीन एक अशी दोन पिल्ले जन्माला आली. किंग बेबीने अंड्यातून बाहेर येताच इतर अंड्यांच्या भोवती रेलचाल सुरू करून इतरांना अंड्यातून बाहेर येण्यासाठी प्रोत्साहित केले, असे सर्प तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता या पिल्लांना थोडेसे मोठे झाल्यावर नैसर्गिक अधिवासात, जंगलात सोडून देण्यात येणार आहे. जर सर्पतज्ञ हसमुख वळंजू (२९) व अमान खान (२0) यांनी वेळीच लक्ष घालून ही अंडी वन खात्याच्या परवानगीने ताब्यात घेतली नसती तर ती अंडी घोरपड, कोब्रा नाग इतर वन्य जीव, मोठे पक्षी यांचे भक्ष्य झाली असती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -