घरताज्या घडामोडीबोरिवलीतील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचं आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण, आता होणार सुरक्षित...

बोरिवलीतील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचं आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण, आता होणार सुरक्षित प्रवास

Subscribe

बोरिवली (पश्चिम) येथील आर. एम. भट्टड मार्गावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक १८ जून २०२२) सायंकाळी झाले. अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग बांधलेल्या या पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची विशेषत्वाने काळजी घेण्यात आली आहे.

या लोकार्पणप्रसंगी माजी आमदार तथा म्हाडा सभापती श्री. विनोद घोसाळकर, स्थानिक खासदार श्री. गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार श्री. सुनील राणे, आमदार श्री. विलास पोतनीस, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी-सक्रे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) श्री. सतीश ठोसर प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. अशोक मिस्त्री, आर / मध्य विभागाचे सहायक आयुक्त श्री. जावेद वकार, विविध माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पाची संक्षिप्त माहिती – 

आर. एम. भट्टड मार्गावर बोरिवली (पश्चिम) मधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलापर्यंत बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या भागातील वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारित झाला असल्याने वाहतुकीचा वेग तर वाढणार आहेच सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.

- Advertisement -

सुमारे ९३७ मीटर लांब अंतराच्या या उड्डाणपुलावर पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार मार्गिका आहेत. कंपोसिट सेक्शन तंत्रज्ञान वापरून व एक स्तंभ पद्धतीने बांधलेल्या या उड्डाण पुलावर अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी घेतली गेली आहे.

सदर उड्डाणपुलासाठी १३ हजार ३४७ घन मीटर काँक्रिट, २ हजार ९०० मेट्रिक टन रिइन्फोर्समेंट स्टील, तर ४ हजार १८६ स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे १७३ कोटी रुपये खर्च झाला आहे.


हेही वाचा : अग्निपथ योजनेवरुन अभिनेत्री दिपाली सय्यद यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -