Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात पण चर्चांना उधाण

प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात पण चर्चांना उधाण

Related Story

- Advertisement -

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या बैठकीत नेमकी कोणती रणनीती ठरणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर संन्यास घेतला आहे. मात्र, देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे मानले जाणारे शरद पवार यांच्या भेटीला प्रशांत किशोर येत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीत कोणती रणनीती ठरणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ही भेट केवळ महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

शरद पवार यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी निवडणुकांबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी कालच्या भाषणात पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र असणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असलं तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे ह्या भेटीची मोठी उत्सुकता आहे.

- Advertisement -

- Advertisement -